
इचलकरंजी: पत्नीशी जवळीक साधल्याच्या संशयावरून पतीने आपल्या भावाच्या मदतीने मित्रालाच दगडी वरवंट्याने ठेचून ठार मारल्याची थरकाप उडवणारी घटना येथे घडली. या घटनेत विनोद आण्णासो घुगरे (वय ३२, रा. गणेशनगर, गल्ली नं. ३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष दशरथ ऊर्फ वसंत पागे ऊर्फ नागणे (वय ३८) आणि संजय दशरथ पागे (वय ३६, दोघे रा. गल्ली नं. साडेतीन, गणेशनगर, शहापूर, ता. हातकणंगले) या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.