
- राजेंद्र दळवी
पन्हाळा : वीर शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अतुलनीय असून पन्हाळगडावरील त्यांच्या स्मारक परिसराच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.