सिंगल यूज प्लास्टिकच्या साठवणुकीवर कारवाई करा

जिल्हाधिकारी राहुल रेखावार; तपास करून अहवाल सादर करण्याची बैठकीत सूचना
Plastic-Ban
Plastic-Bansakal

कोल्हापूर - सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून, सिंगल यूज प्लास्टिक वापर रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करा, सिंगल यूज प्लास्टिक साठवणूक, विक्री होत असल्यास संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सिंगल यूज प्लास्टिकसंदर्भात आयोजित बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस उप प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, जे. एस. साळुंखे , प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, सिंगल युज प्लॉस्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असून, याबाबत केंद्र सरकार व राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत. महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेने सिंगल युज प्लॉस्टिक वापर, विक्री रोखण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. ज्या ठिकाणी सिंगल युज प्लॉस्टिकचा साठा आहे, विक्री होत आहे अशा ठिकाणची तपासणी करुन साठा जप्त करावा. सिंगल युज प्लॉस्टिकचा साठा व विक्री पुन्हा वापर होणार नाही याबाबत संबधिताना कडक सूचना द्याव्यात. दुसऱ्यांदा त्यांच्याकडून कायद्याचे पालन न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी.

सिंगल यूज प्लास्टिकची किरकोळ, घाऊक विक्री करणाऱ्यांची यादी संबंधित यंत्रणांना पाठविण्यात आली असून, त्यानुसार यंत्रणांनी तपास करून अहवाल सादर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी माने यांनी बैठकीत सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com