

TET Protest Kolhapur
esakal
Kolhapur TET Protest : कोल्हापुरात टीईटी सक्तीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी शिक्षक आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आलेला मोर्चा कार्यालयात जाण्यासाठी हट्ट धरणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिक्षक आणि साध्या वेशातील पोलिसांमध्ये वाद झाला. यानंतर वर्दीतील पोलिस एकत्र येत जोरदार धक्काबुक्की झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनली होती परंतु शिक्षकांनी माघार घेतल्यानंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.