

Teachers opposchoolse TET compulsion
sakal
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) सक्तीला जिल्ह्यातील शिक्षकांनी आज ‘आक्रोश’ मोर्चातून तीव्र विरोध दर्शविला. सर्व शाळा बंद ठेवून शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाला ताकद दाखविली. टीईटी सक्तीचा निर्णय रद्द केल्याशिवाय आता थांबायचे नाही, असा निर्धारही केला.