
संतोष मिठारी
काेल्हापूर : अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या कोल्हापुरात वाढल्याने साहजिकच पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान बहुतांश शाळांसमोर आहे. आपली शाळा टिकली, तरच आपलं अस्तित्व टिकणार असल्याने पटसंख्या कायम ठेवण्यासह ती वाढविण्यासाठी शिक्षकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उन्हाळी सुटीत शालेय मुलं-मुली घरी असताना शिक्षक मात्र पालकांच्या दारी आहेत. ‘तुमच्या घरी शाळेत जाणारे कोणी आहे का?’, ‘इयत्ता पहिलीमध्ये पाल्याला प्रवेशित केले का?’ अशी विचारणा करत शिक्षकांची धावपळ सुरू आहे.