शिक्षकदिन विशेष ः तंत्रज्ञानाने अध्यापन बनले प्रभावी

शिक्षकदिन विशेष ः तंत्रज्ञानाने अध्यापन बनले प्रभावी

कोल्हापूर ः कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण ही विद्यार्थ्यांची गरज बनली. भविष्यात ऑनलाईन शिक्षणाचा वारू आणखी धावणार आहे. व्हर्च्युअल क्‍लासरूम, "रोबो टिचर', विविध प्रकारचे ऍप, ज्ञानवर्धक संकेतस्थळे यामुळे विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात. मात्र शिक्षणातील शिक्षकाचे महत्त्व आजही तितकेच आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांना पर्याय नसला तरी विकसीत होणारे शिक्षणिक तंत्रज्ञान शिक्षणाची उंची वाढवणारे आहे. अशा काही मोजक्‍या गोष्टींचा घेतलेला आढावा. 

ऍप 
भाषा शिकण्यासाठी विविध प्रकारचे ऍप उपलब्ध आहेत. या ऍपचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषेतून आपण अन्य भाषा शिकू शकतो. यावर ऐकण्याची सुविधा असते. परदेशातून शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी किंवा परप्रांतात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी या ऍपच्या माध्यमातून तेथील भाषा आत्मसात करतात. 

रोबो झाला शिक्षक 
बंगळूरमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ह्युमनॉइड रोबोट वापरला जाते. हा रोबोट रोज सुमारे 300 विद्यार्थ्यांना पाच विषयांचे धडे देतो. विद्यार्थ्यांच्या विविध विषयातील प्रश्नांना उत्तर देतो. "एआय-सक्षम हे रोबोट्‌स जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, इतिहास आणि भौतिकशास्त्र विषयांचे धडे शिकवतात. 

व्हच्युअल बोर्ड 
बहुतांशी शाळांमध्ये आता व्हर्च्युअल बोर्ड आले आहेत. जे शिक्षकांना अध्यापनामध्ये सहाय्यभूत ठरतात. एखाद्या विषयाच्या संबंधीत व्हिडिओ, ऍनिमेशन, ग्राफ त्यावर दाखवता येतात. थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करूनही अनेक व्हिडिओ यावर दाखवता येतात. यामुळे विद्यार्थींना त्या विषयाचे आकलन चांगले होते. प्रत्यक्ष चित्र, व्हिडिओ त्यांच्या मनावर बिंबवला जातो. आवाजाच्या माध्यमातून विद्यार्थी त्या विषयाशी एकरूप होतो. त्यांची स्मरणशक्तीही यामुळे चांगली होते. त्यामुळे व्हर्च्युअल बोर्ड हा एक पर्यायी शिक्षकच आता वर्गामध्ये उभा आहे. 

थ्रीडी प्रिंटर 
थ्रीडी प्रिंटरच्या माध्यमातून सहज शक्‍य झोल्या गोष्टी 
- इतिहास विद्यार्थी तपासणीसाठी ऐतिहासिक कलाकृती प्रिंट (मुद्रित) करू शकतात. 
- ग्राफिक डिझाइनचे विद्यार्थी त्यांच्या कलाकृतीची 3 डी आवृत्ती प्रिंट करू शकतात. 
- भूगोलचे विद्यार्थी भूगोल, लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्या नकाशे मुद्रित करू शकतात. 
- केमिस्ट्रीचे विद्यार्थी रेणूंचे थ्रीडी मॉडेल्स प्रिंट करू शकतात. 
- जीवशास्त्र विद्यार्थी पेशी, व्हायरस, अवयव आणि इतर जैविक कलाकृती छापू शकतात. 


लोकप्रिय शैक्षणिक ऍप 
एडएक्‍स, खान अकादमी, दुओलिंगो, स्मरण करून द्या, फोटोमाथ, सोलोलर्न, क्विझलेट, कहूत 


शिक्षणामध्ये शिक्षकाला पर्याय नाही. मात्र शिक्षकांना अध्यापनासाठी सहाय्यभूत ठरणारे तंत्र विकसीत झाले आहे. या तंत्राची मदत घेऊन विद्यार्थी स्वयंअध्यायन करू शकतात. तसेच शिक्षक या तंत्राच्या सहाय्याने अधिक प्रभावी अध्यापन करू शकतात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या शतकात या नव्या तंत्राला महत्त्व आहे. 
- प्रा.डॉ.आर.के.कामत, (संगणकशास्त्र विभाग प्रमूख, शिवाजी विद्यापीठ.

-संपादन - यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com