कोल्हापुरात शिवसेनेच्या बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण; पहिल्यांदाच..

बॅनरवर नेत्यांसोबत तेजस ठाकरेंचा फोटो झळकल्याने ते राजकारणात प्रवेश करत असल्याची चर्चा सुरु आहे.
Tejas Thackeray Shiv Sena Kolhapur
Tejas Thackeray Shiv Sena Kolhapuresakal
Updated on: 
Summary

बॅनरवर नेत्यांसोबत तेजस ठाकरेंचा फोटो झळकल्याने ते राजकारणात प्रवेश करत असल्याची चर्चा सुरु आहे.

कोल्हापूर : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतानाच ठाकरे आणि शिंदे गटात अनेकांचा प्रवेश सुरु आहे. काही जण शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत, तर काही जण ठाकरे गटाच्या पाठिशी असल्याचं म्हणत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) दोन गटात विभागली गेली आहे. ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरुय.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमुळं या चर्चेला अधिकच बळ मिळालं होतं. त्यानंतर आता तेजस ठाकरेंचा कोल्हापुरातील शिवसेनेच्या मेळाव्यात बॅनरवर नेत्यांसोबत तेजस ठाकरे यांचाही फोटो झळकल्यानं तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश झाल्याची चर्चा सुरु आहे.

Tejas Thackeray Shiv Sena Kolhapur
Supriya Sule : शंभूराज देसाईंच्या 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंना झालं दुःख!

कोल्हापुरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा

शिवसेनेच्या या बॅनरवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा फोटो आहे. तर, बॅनरच्या डाव्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो देण्यात आला आहे. नंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहे. शिवाय, आदित्य ठाकरेंच्या फोटोनंतर तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. कोल्हापुरात नुकताच शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान PIF संघटनेविरोधात ही बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमात हिंदू आणि हिंदुत्वासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ शिवसेनेवर आली असल्याचं म्हणत शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

Tejas Thackeray Shiv Sena Kolhapur
VIDEO : खुद्द नितीश कुमारांनीच तेजस्वीला 'मुख्यमंत्री' म्हणून स्वीकारलं? जाणून घ्या नेमकं काय घडलं

शिवसेनेचा नवा चेहरा 'तेजस ठाकरे' असणार

विशेष म्हणजे, पहिल्यांदाच कोल्हापूरच्या मेळाव्यात शिवसेनेच्या बॅनरवर तेजस ठाकरे यांचा फोटो झळकत आहे. यावरून शिवसेनेचा नवा चेहरा तेजस ठाकरे हा असणार हे आता स्पष्ट होत चाललं आहे. मेळाव्यात शिवसेनेच्या वतीनं PIF संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. दसरा चौकातील छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांच्यासह हर्षल सुर्वे, मंजित माने, स्मिता मांडरे सावंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com