
कोल्हापूर : ‘राज्य परिवहन महामंडळामार्फत एक हजार ३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे’, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.