
Kolhapur Assembly Updates : ‘बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी माझ्या आमदारकीच्या काळात आठ कोटी ६४ लाखांचा निधी खर्च केला, मात्र, दोन दिवसांपूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माझ्यावर गेल्या पाच वर्षात शंभर रुपयांचाही निधी आणला नाही, असा आरोप केला. त्यांनी याबाबत किमान एकदा तरी माहिती घेऊन बोलायला हवे होते,’ असे प्रत्युत्तर माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिले आहे.