सरूड : मूळचे शाहूवाडी तालुक्यातील कोतोली या छोट्याशा खेड्यातील असलेले जम्मू्-काश्मीरच्या डोडा किश्तवाड रामबन परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीर पोलिस दल, भारतीय सेना (Indian Army) आणि सीआरपीएफ यांच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन राबवून तीन मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा केला. मराठी आधिकाऱ्याच्या या पराक्रमाने तालुक्याची, जिल्ह्याचीच नव्हे, तर अखंड महाराष्ट्राची मान उंचावली आहे.