कोल्हापूर - परीक्षार्थींची परीक्षा सुरुच! TET साठी उशिर झालेल्यांना प्रवेश नाकारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET

विद्यार्थी पालक आणि परीक्षा केंद्रावर अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.

परीक्षार्थींची परीक्षा सुरुच! TET साठी उशिर झालेल्यांना प्रवेश नाकारला

कोल्हापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीइटी) आज सुरूवातीलाच गोंधळ झाला. एसटी संपामुळे काही विद्यार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोचू शकले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. योग्य कारण असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे कारण सांगितले गेले नाही. त्यामुळे विद्यार्थी पालक आणि परीक्षा केंद्रावर अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. शहरातील दोन ते तीन परीक्षा केंद्रांवर हा गोंधळ झाला.

हेही वाचा: 'अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रात का नाही? CM यांचा कोणावर विश्वास नाहीये का?

जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. टीइटी पेपर १ साठी ८ हजार ७३१ आणि पेपर २ साठी ८ हजार ८७३ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे. एकूण १७ हजार ६०४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता पहिला पेपर सुरू झाला. पेपर सुरू होण्याच्या आधी अर्धा तास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे अशी पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र एसटीचा संप चालू असल्याने विद्यार्थ्यांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करून परीक्षा केंद्रावर यावे लागले. परीक्षा सुरू होण्यास पाच मिनिटांचा अवधी असतानाच केंद्र प्रवेश नाकारण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. तेथील अधिकाऱ्यांनी पालकांना याचे कारण सांगितले नाही. त्यामुळे पेपरच्या आधीच परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाला.

हेही वाचा: "गरज पडल्यास कृषी कायदे पुन्हा आणू"

loading image
go to top