टीईटी परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या कबुलीवरून पोलिस तपास अधिक गतीने सुरू आहे.
esakal
कोल्हापूर
TET Paper Leak : 'टीईटी' पेपर फुटला! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर, विद्यार्थ्यांकडून कबुली; २६ संशयितांची नावे निष्पन्न...
TET Exam Paper Leak : टीईटी परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या कबुलीवरून पोलिस तपास अधिक गतीने सुरू आहे.
Police Investigation TET Paper leak : ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) पेपर फुटीच्या प्रयत्नाचा पोलिस तपास आता ‘पेपर फुटला’ असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या दोन विद्यार्थ्यांनीच याची कबुली दिल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखीन वाढली आहे. दोघांनाही परीक्षेपूर्वी मिळालेल्या पेपरमधील बहुतांश प्रश्न पडल्याचेही सांगितले. दरम्यान, पोलिसांचे एक पथक रात्री उशिरा पाटणा (रा. बिहार) येथे संशयित रितेशकुमार व दोन साथीदारांच्या शोधासाठी रवाना झाले.

