esakal | स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड

स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : ‘मुलगी हुशार आहे. चांगला अभ्यास केला तर कलेक्टर नक्की होईल,’ असा कयास प्राध्यापक वडिलांनी बांधला. तिने ‘यूपीएससी’चे दोन-तीन प्रयत्न केले; पण यश मिळत नव्हते. नंतर तिने ‘एमपीएससी’च्या ही परीक्षा दिल्या पण त्यात ही अपयश पदरी आले. याच कालावधीत तिच्या वडिलांचे निधन झाले. तिने छोट्या बहिणीच्या मदतीने केक निर्मितीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. कल्पकता पणाला लावत यांनी ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड कोल्हापुरात प्रसिद्ध केला आहे.

सासने ग्राऊंउंड येथे राहणाऱ्या प्रिया प्रकाश जाधव हिचा प्रवास प्रेरणादायी आहे.
राज्यशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर प्रियाला पुण्याला अभ्यासासाठी पाठवले. पुण्यात तिने ‘यूपीएससी’चा अभ्यास सुरू केला. एकवर्षभर क्लासही केला. नंतर ती कोल्हापुरला परतली. स्पर्धा परीक्षेबरोबर तिने विद्यापीठातून एम.ए. तसेच मास कम्युनिकेशनची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेचा तिचा अभ्यास सुरूच होता. छोटी बहीण स्नेहाने भूगोल विषयातून एम.ए पूर्ण केले. तिला पीएच.डी.साठी विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. दोघींचा चांगला अभ्यास सुरू होता. प्रिया स्पर्धा परीक्षेबरोबर सेट, नेटच्या परीक्षा देत होती; पण थोडक्यात यश हुलकावणी देत होते. वडिलांचे स्वप्न म्हणून ती अभ्यास करत राहिली; पण स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता तिच्या लक्षात येतं होती. यातच कोरोनाचा शिरकाव झाला. या कालावधीत ‘होम बेकिंग’ची चलती वाढू लागली.

हेही वाचा: जरबेऱ्याच्या शेतीतून दरवळला यशाचा सुगंध; अक्षयची लाखोंची उलाढाल

केक निर्मिती घराघरांत वाढत होती. प्रियाने बहीण स्नेहाला सोबत घेत प्रयोग केला. कल्पकता लढवत विविध डिझाईन्सच्या केकची निर्मिती त्यांनी सुरू केली. या केकचे फोटो त्यांनी फेसबुक, इन्स्ट्राग्राम या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केले. लॉकडाउन काळात चांगल्या ऑर्डर येऊ लागल्या. ग्राहकांना केकचे फिनिशिंग, चव आवडू लागली. त्यांनी या नव्या व्यवसायाचे ‘केकोबा’ असं नामकरण केले. हा बॅण्ड कोल्हापुराकरांच्या पसंतीला उतरला. पेस्ट्री केक, थिम केक, नॉनव्हेज थाळी, रसमलाई अशा केकच्या प्रकारांची त्यांना मागणी आहे. घरी केकची निर्मिती करून प्रिया व स्नेहा होम डिलिव्हरीची सेवा पुरवत आहेत. यातून महिन्याला ६० ते ७० हजारांची उलाढाल होते. जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.
(समाप्त)

"स्पर्धा परीक्षा करताना आपली क्षमता ओळखने गरजेचे असते. दुसरे करतात म्हणून आपण ही करावं असे ठरवलं तर यश मिळणे कठिण होते. काही प्रयत्नात यश नाही मिळाले तर तरुणांनी इतर पर्यायाकडे वळावे. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा."

- प्रिया जाधव

हेही वाचा: खचायचं नाही, लढायचं : अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले तरी कृषी केंद्रातून सेवा

loading image