esakal | गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे अमिष; १८ लाखांची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक

गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे अमिष; १८ लाखांची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: ठकसेनाविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात १८ लाखांच्या फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. मीर सरफराज अली (वय ४८, रा. हैद्राबाद, तेलंगणा) असे त्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नोकरीच्या अमिषाने १८ लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित मीर अलीला अटक केली.

हेही वाचा: Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

दरम्यान त्याच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिसात दाखल झाला. किसन खंदारे हे नागाळा पार्क येथे राहतात. त्यांचा भाऊसिंगजी रोडवर व्यवसाय आहे. त्यांच्याशी संशयित मीरने २०२० मध्ये संपर्क साधला. त्यांना सोन्याच्या व्यवहारमध्ये पैसे गुंतवा, तुम्हाला चांगला परतावा व फायदा मिळवून दतो असे सांगून विश्वास संपादन केला.

त्यांच्याकडून २३ ऑक्टोबर ते १२ डिसेंबर २०२० या काळात टपाप्याने १८ लाख रूपये घेवून फसवणूक केली. अशी फिर्याद खंदारे यांनी दिली. त्यानुसार संशयित मीरवर गुन्हा दाखल झाला. त्याच्या कोठडीत १५ सप्टेंबर पर्यंत न्यायालयाने वाढ दिली आहे. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यात येईल असे सहायक फौजदार प्रदीप शेंगाळ यांनी सांगितले.

loading image
go to top