
Kolhapur Flood : महापूर आणणारा सर्वाधिक पाऊस १५ जुलै ते १५ ऑगस्ट याच कालावधीत पडल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. २००५, २०१९, २०२१ या वर्षात अतिवृष्टी होऊन पावसाने जिल्ह्याला महापुराच्या संकटात आणले होते. गेल्या १७ वर्षांचा विचार करता प्रत्येक वर्षी जुलै ते ऑगस्टमध्येच सर्वाधिक पाऊस पडला आहे. यंदाही एक जूनपासून आतापर्यंत ४१८ मिमी पाऊस पडला आहे.