कोल्हापूर : सीपीआरमधील अतिक्रमणाचा धोका वाढतोय

तीन वर्षांपासून केवळ चर्चा : कारवाईसाठी चालढकल
कोल्हापूर : सीपीआरमधील अतिक्रमणाचा धोका वाढतोय
कोल्हापूर : सीपीआरमधील अतिक्रमणाचा धोका वाढतोय

कोल्हापूर : जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असणाऱ्या सीपीआरला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. झेरॉक्‍स सेंटर, उपहारगृह, झुणका भाकर केंद्र, चहा टपरी, नास्ता सेंटरसह इतर अतिक्रमणामुळे सीपीआरचा जीव गुदमरतोय अशी परिस्थिती आहे. ही अतिक्रमणे काढावीत, यासाठी वारंवार जिल्हा प्रशासन व सीपीआर प्रशासनाकडे मागणी होत आहे. सीपीआरमधील रुग्णांना ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनशेजारीच काही टपरीवर चहा उकळत असतो, हे गंभीर आणि धोकादायक आहे. मात्र, कारवाईविना केवळ चालढकल केली जात आहे.

सीपीआरमध्ये कोल्हापूरसह कोकण आणि कर्नाटकमधून रुग्ण उपचारासाठी येतात. कोरोना संसर्गादरम्यान अनेक गरीब रुग्णांना सीपीआरचा मोठा आधार मिळाला. ज्यावेळी रुग्णांची संख्या वाढते, त्यावेळी सीपीआर परिसरात रुग्णवाहिका असो किंवा आपत्तीवेळी अग्निशमन दलाला आपली यंत्रणा गतिमान करण्यास अडथळा निर्माण होत असतो.

कोल्हापूर : सीपीआरमधील अतिक्रमणाचा धोका वाढतोय
'ओमिक्रॉन'ने वाढविली चिंता, निपाणीकर मात्र बिनधास्त!

दोन वर्षांपासून कोरोनामुळे सीपीआरमधील रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागते. यासाठी ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्पही उभारला आहे. ऑक्‍सिजन प्रकल्पाद्वारे सुमारे ४५० हून अधिक बेडना ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात आहे. ज्या ठिकाणी ऑक्‍सिजनची पाईप जाते, तिथेच टपरीवर खाद्यपदार्थ आणि चहा शिजवला जातो. या धोक्याची जाणीव असूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. तीन ते चार वर्षांपासून या अतिक्रमणाबद्दल अनेक स्तरातून चर्चा होते.

हे अतिक्रमण काढावे यासाठी विविध संघटनांकडून मागणीही होत आहे. या सर्व मागण्या बेदखल केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन व सीपीआर प्रशासनाकडून यावर वारंवार चर्चा होते. अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त मात्र ठरत नाही.

कोल्हापूर : सीपीआरमधील अतिक्रमणाचा धोका वाढतोय
कोल्हापूर : जिल्ह्याचे नेमके उत्पन्न समजणार

गंभीर घटनेनंतरच जाग येणार का?

२९ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास सीपीआरमध्ये आग लागली. यावेळी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या काही रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांना जीवाची बाजी लावावी लागली. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा निष्कर्ष काढला होता. आता ऑक्‍सिजनच्या पाईप खालीच गॅस सुरू असतो. ज्यांनी अतिक्रमण केली आहेत, त्यांना इतरत्र जागा दिली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com