सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या ग्रंथालयांनाही तंत्रज्ञानातील (Technology) बदलावर स्वार व्हावे लागणार आहे.
ज्ञानसंपन्न पिढी घडविण्यासाठी ग्रंथ महोत्सवासारखे (Book Festival) उपक्रम महत्त्वाचे आहेत. शिवाजी विद्यापीठात (Shivaji University Kolhapur) ग्रंथालयाच्या तंत्रज्ञानावर आधारित गोष्टींचा उहापोह झाला. तो महत्त्वाचा आणि भविष्यकाळाचा वेध घेणारा होता.