Forest Department : 'या' महागड्या झाडांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवर कुत्री पाळण्याची वेळ; काय आहे नेमकं कारण?

चंदनाची रोपे मोठी होताच झाडांच्या चोरी प्रकारात वाढ झाली आहे.
Sandalwood Tree
Sandalwood Treeesakal
Summary

झाडांच्या संरक्षणासाठी वन आणि पोलिस खाते अपयशी ठरले आहे.

बेळगाव : राज्यातील अनेक भागासह बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Farmer) जमिनीत चंदनाच्या झाडांची (Sandalwood Tree) लागवड केली आहे. शेती उत्पादनासह आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी चंदनाची रोपे लावण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी वन खात्याचे (Forest Department) सहाय्य मिळत असून चंदनाच्या रोप लागवडीसाठी प्रशासनाकडून रोपेही पुरवण्यात येत आहेत.

Sandalwood Tree
Sadabhau Khot : राजू शेट्टींची 'ही' मागणी पूर्ण झाल्यास, मी राजकारण सोडतो; सदाभाऊंचं ओपन चॅलेंज

मात्र, चंदनाची रोपे मोठी होताच झाडांच्या चोरी प्रकारात वाढ झाली आहे. याकडे वन खात्यासह पोलिसांचेही दुर्लक्ष झाल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. यामुळे चंदनाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.

राज्यभरात पाच वर्षांत चंदन चोरीची हजारो प्रकरणे घडली आहेत. परंतु, या झाडे चोरांचा शोध लावण्यास वनखात्यासह पोलिस खातेही अपयशी ठरले असून त्यांनी चोरलेल्या चंदनाची झाडेही सापडत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. बेळगाव आणि खानापूर जिल्ह्यातील लाल मातीत चंदनाच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Sandalwood Tree
आता आरपारची लढाई! मुश्रीफ-सतेज पाटलांना गुडघे टेकायला लावणार; ऊसदरावरुन शेट्टींचा आक्रमक पवित्रा

प्रशासनाकडून रोपांचे वितरण करण्यात येत असल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी वनखात्याच्या सहाय्याने आपल्या शेतजमिनीत चंदनाची रोपे लावून ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सदर झाडे ८-१० वर्षांची होताच रातोरात चोरांकडून झाडांची चोरी (तोडणी) करण्यात येत आहे. मात्र, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन खात्यासह पोलिस खात्याकडून भरीव प्रयत्न होताना दिसून येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बेळगाव सीमाभागात चंदनाच्या झाडांची चोरी करण्याची एक टोळी सक्रिय असून विविध शेतजमिनीत चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या चंदनाच्या झाडांची ओळख पटवून या टोळीकडून ही झाडे तोडून नेण्यात येत आहेत. झाडे तोडताना मोठा आवाज येऊ नये, याचीही काळजी घेण्यात येत असून त्यांच्याकडे अत्याधुनिक कापणी यंत्राचा वापर होत आहे.

Sandalwood Tree
वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती आता WhatsApp वर कळवा; 'महावितरण'चे नागरिकांना आवाहन

बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मागील आठवड्यात ५० हून अधिक चंदनाच्या झाडांची चोरी करण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी वन आणि पोलिस खाते अपयशी ठरले आहे. यासाठी शेतातील चंदनाच्या झाडांच्या संरक्षणासाठी ५ ते ८ मुधोळ कुत्री पाळण्याची वेळ आली आहे. या झाडांच्या संरक्षणासाठी मासिक १० हजार रुपये पर्यंत खर्च करीत आहोत.

-सुरेश पाटील, शेतकरी

बेळगाव जिल्ह्यात कृषी जमिनीत शेतकऱ्यांनी वाढवलेली चंदनाच्या झाडांच्या चोरी प्रकरणाबाबत माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. कोणत्या भागात चंदन झाडांची लागवड केली आहे. त्या संबंधित ठिकाणी झाडांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना हाती घ्यावी, अशी सूचना वनखाते आणि पोलिस खातांच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

-नीतेश पाटील, जिल्हाधिकारी, बेळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com