कोल्हापूर : 'ते' आश्वासन स्वार्थापोटी

परशुराम उपरकर जनतेला दिलासा देण्याची नौटंकी त्यांनी बंद करा
परशुराम उपरकर
परशुराम उपरकरsakal
Updated on

सावंतवाडी : बांदा व दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांवरील ठिकठिकाणी पडलेले खड्डे स्वखर्चाने भरून देण्याचे आश्वासन देणाऱ्या ठेकेदारांनी आपला स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊनच ही घोषणा केली आहे. पुढील कामे वाढीव दराने मिळावीत, यासाठीच त्यांची धडपड चालवली असून जनतेला दिलासा देण्याची नौटंकी त्यांनी बंद करावी, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

माजी आमदार उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, ओंकार कुडतरकर, अभय देसाई, सूरज देसाई, लक्ष्मीकांत हरमलकर आदी उपस्थित होते.

श्री. उपरकर म्हणाले, "काल पत्रकार परिषद घेत 4 ठेकेदारांनी बांदा तसेच अन्य दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने भरून देण्याची घोषणा केली आहे. वाहनधारकांना झालेल्या त्रासाबाबत ऋण व्यक्त केले आहेत. मुळात पुढील कामे वाढीव दराने मिळावीत यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. ठेकेंदारांनी घेतलेल्या या भूमिकेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कौतुक करते; पण यापूर्वी जी काही निकृष्ट दर्जाची कामे जिल्ह्यात झाली आहेत, त्यांचे श्रेय सुद्धा याच ठेकेदारांना द्यावे लागेल. कित्येक वेळा लोकप्रतिनिधीनि सांगून सुद्धा रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

परशुराम उपरकर
शासनाने ST कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये; कामगार युनियनचा इशारा

2019 व 2020 ला याच ठेकेदारांनी 4 टक्के वाढीव दरांनी कामे घेतली आणि त्यावेळी कामे पूर्णही केली; मात्र आता पैसे नाहीत, म्हणून हेच ठेकेदार वेळेत कामे पूर्ण करीत नाही अशी परिस्थिती आहे. कार्यकारी अभियंता यांनी तीन वेळा नोटीस काढून देखील गेली दोन, तीन व पाच वर्षे झाली तरी कामे रेंगाळली आहेत. आता पैसे नाहीत म्हणून कामे न करण्याचा तसेच ती अपूर्ण ठेवण्याचा सपाटा ठेकेदारांनी लावला आहे. याचे उत्तर त्यांनी द्यावे. कामांना निधी नाही म्हणून जर कामे अपूर्ण ठेवली असतील तर त्यांनी निविदाच भरता कामा नये होते; मात्र निविदा भरून सगळी कामे अडवून ठेवत इतर नवीन प्रामाणिक ठेकेदारांची गळचेपी या ठेकेदारांनी केली आहे."

श्री. उपरकर पुढे म्हणाले, "पालकमंत्री असताना आमदार दीपक केसरकर यांनी याच ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण व दर्जेदार न केल्यामुळे काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता; मात्र आता हेच आमदार केसरकर त्यांना वाढीव दराने कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्वखर्चाने बांदा- दोडामार्ग बुजविण्याची घोषणा करून शासनाची पुढील टेंडरे वाढीव दराने मिळवण्यासाठी संबंधित ठेकेदार नौटंकी करत आहेत. संबंधित ठेकेदारांनी यापूर्वी केलेली अर्धवट कामे पूर्ण केल्याशिवाय आम्ही त्यांना नवीन कामे मिळवू देणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com