मॉर्निग वॉकला कुलुप लावून गेले तोवर चोरट्याने पैशाचे घबाड नेले, गडमुडशिंगी येथील प्रकार

 The thief took the money by the time he got to the Morning Walk
The thief took the money by the time he got to the Morning Walk
Updated on

गांधीनगर ः बंगल्यामध्ये कोणी नसल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील बांधकाम व्यवसायिक जमाल आलमसाब मुल्ला यांच्या बंगल्यामधील तिजोरी उचकटून साडेआठ लाख रुपये लंपास केले. हा प्रकार रविवारी सकाळी सहा ते पावणे सातच्या दरम्यान झाला. रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. 

घटनास्थळावरून आणि मुल्ला यांनी दिलेली माहिती अशी : गडमुडशिंगी येथील घोरपडे मळ्यामध्ये बांधकाम व्यावसायिक जमाल मुल्ला यांचा बंगला आहे. सकाळी ते फिरण्यासाठी मुलासह कुत्र्याला घेऊन फिरायला गेले. बंगल्यात कोणीही नसल्याचा चोरट्याने फायदा उठवला. बंगल्याचे कुलूप काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तिजोरी उचकटून त्यातील साडेआठ लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान 50 च्या नोटा असलेले दुसऱ्या तिजोरीतील एक लाख रुपये चोरटे घेऊन गेले नाहीत. मुल्ला सकाळी फिरून बंगल्यावर आल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसही घटनास्थळी येऊन गेले. त्यांनी सर्व पाहणी केली. सीसीटीव्हीचा बॉक्‍सही चोरट्यांनी पळवला असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. 
दरम्यान, सकाळपासून मुल्ला गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ताटकळत थांबले होते. त्यांच्याकडून चोरीची माहिती घेण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांच्याकडून रात्री बराच उशीर सुरू राहिले. 

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com