सावधान, घराबाहेर पडताय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

In aambai tank erea 2 Flat theif

अंबाई टॅंक परिसरातील "हिराश्री लेक सिटी'मधील दोन बंद फ्लॅट चोरट्याने फोडले. त्यातील लॅपटॉपसह 10 हजार रोकड लंपास केली. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

सावधान, घराबाहेर पडताय

कोल्हापूर ः अंबाई टॅंक परिसरातील "हिराश्री लेक सिटी'मधील दोन बंद फ्लॅट चोरट्याने फोडले. त्यातील लॅपटॉपसह 10 हजार रोकड लंपास केली. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. 
घटनास्थळावरून मिळालेली माहिती, अंबाई टॅंक परिसरात "हिराश्री लेक सिटी' अपार्टमेंट आहे. यातील आठव्या मजल्यावरील दोन फ्लॅट बंद होते. चोरट्याने टेरेसवरून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. एका फ्लॅटमधील लॅपटॉप तर दुसऱ्या फ्लॅटमधील 10 हजार रोकड लंपास केली. त्याठिकाणी एक रुपयाच्या नोटांचा बंडल टाकून चोरटा तेथून निसटला. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. याच परिसरातील बंगलाही चोरट्याने फोडला असून त्यातील कपडे चोरट्याने लंपास केले अशी चर्चा सुरू होती. नागरिकांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन माहिती घेण्याचे काम सुरू केले. 

फ्लॅटधारक चिंतेत... 
अपार्टमेंटमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था असून सीसी टीव्हीही बसविले आहेत. टेरेससवर जाताना दरवाजाला लॉक आहे. पण चोरटा टेरेसवर गेला कसा या प्रश्‍नांने आम्ही चिंतेत असल्याचे फ्लॅटधारक पोलिसांना सांगत होते.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Web Title: Thieves Made Flat Targets

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
go to top