esakal | चोरट्यांनी दागिन्यांची तिजोरीच उचलून नेली...

बोलून बातमी शोधा

Thieves pick up jewelry vault ..

आजपर्यंत जिल्ह्यात चोरीच्या दरोड्याच्या अनेक घटना आपण वाचल्या आणि पाहिल्या असतील पण बिद्री येथील भरचौकात असलेले सराफी दुकान फोडून आख्खी तिजोरीच उचलून नेऊन भातशेतीत फोडली

चोरट्यांनी दागिन्यांची तिजोरीच उचलून नेली...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बिद्री (कोल्हापूर)  : येथील गारगोटी-कोल्हापूर रोडवर मुख्य बाजारपेठ असलेल्या त्रिशिखा ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असलेली तिजोरी सुमारे पाचशे मीटर शेतात नेऊन फोडून रोकडसह सव्वा लाखाचे दागिने लंपास केले. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील सौरभ सुनील वारके यांचे बिद्री मौनीनगर येथील दत्त मंदिराशेजारी त्रिशिखा ज्वेलर्स हे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून सोन्या-चांदीचे दागिने असलेली तिजोरी उचलून बाहेर आणली. मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरून तिजोरी पलीकडे नेत महालक्ष्मी प्लाझाच्या मागे असलेल्या भातशेतीत नेऊन फोडली. त्यातील सोन्या - चांदीचे दागिने व रोकड लंपास केली.

चोरीत 15 हजार रुपयांचे सोन्याचे, तर 96 हजारांचे अंदाजे चार किलो वजनाचे चांदीचे दागिने यासह रोकड चार हजार रुपये असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दुकानासमोर असलेल्या महालक्ष्मी प्लाझामधील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून त्यामध्ये चार पुरुष व एका महिलेचाही समावेश आहे.

घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वानाने घटनास्थळापासून बिद्री-वाळवा रस्त्यावरील साखर कारखाना मुख्य गेटपर्यंत माग काढला व तेथेच ते घुटमळले. घटनेचा तपास मुरगूडच्या सपोनि विद्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय किशोर खाडे व सहकारी करत आहेत.