

Police Action Airport
esakal
Sangli Police : गांधीधाम-बंगळूर रेल्वेने प्रवास करणाऱ्या रेखा मनोजकुमार मालपाणी यांच्या तब्बल २३ तोळे सोने चोरीचा छडा लावण्यात मिरज लोहमार्ग पोलिसांना यश आले. मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याकडील सर्व्हेलन्स पथकाने हरियाना राज्यातील सराईत सांसा टोळीतील कुलदीप रामफळ, अमितकुमार बलवानसिंग, अजय सतीशकुमार, मोनू राजकुमार, हवासिंग फत्तेसिंग यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता नऊ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.