esakal | ब्रेकिंग - राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले ; पंचगंगेच्या पातळीत होणार वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

Three gates reopened of Radhanagari Dam kolhapur

राधानगरी धरण क्षेत्रावर व दाजीपूर परिसरात दमदार पाऊस सुरू आहे.

ब्रेकिंग - राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा खुले ; पंचगंगेच्या पातळीत होणार वाढ 

sakal_logo
By
राजू पाटील

राधानगरी : राधानगरी तालुक्यात पावसाची उघडझाप असली तरी तिनही धरणावर संततधार कायम राहिल्याने राधानगरीचे तीन स्वयंचलित दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. यातून व पायथ्याच्या वीज घरातून मिळवून  5684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.  

काल सर्व दरवाजे बंद झाले होते. आता पुन्हा भोगावती व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरण आज ९६ टक्के भरले आहे. पाचही वक्राकार दरवाजे बंद असून त्याच्या विजगृहातून फक्त विसर्ग सुरू असल्याने दूधगंगेचा पूर ओसरत आहे. 


राधानगरी धरण क्षेत्रावर व दाजीपूर परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण कमाल पाणीपातळीपेक्षा अधीक झाल्याने आज सकाळी दोन दरवाजे खुले झाले. तर सायंकाळी तिसरा उघडला. यावेळी पातळी 347.60 फूटापर्यंत झाली होती. हे दरवाजे 347.50 फूटापर्यंत नियंत्रीत राहतात. 

हे पण वाचा - ...अखेर‘ लालपरी’धावली ; कसे असणार कोल्हापूर आगाराचे वेळापत्रक?

आज दिवसभर तालुक्यात उघडझाप राहिली मात्र धरणामध्ये येणारी पाण्याची आवक यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. यामुळे नदांचे ओसरणारे पाणी पुन्हा हळूहळू पसरणार आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top