एकही डोस न घेतलेले जिल्ह्यात तीन लाख लोक | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसींचे डोस

कोल्हापूर : एकही डोस न घेतलेले जिल्ह्यात तीन लाख लोक

कोल्हापूर : ओमिक्रॉन या नवा विषाणूची चाहूल लागताच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला पुन्हा गर्दी होत आहे, तर अनेकांना परराज्यात जाताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपकत्र शोधण्याची ही लगबग सुरू आहे. अशा स्थिती जिल्ह्यात अद्याप पहिल्या डोस न घेतलेले तीन लाख तर दुसरा डोस न घेतलेले दोन लाख व्यक्ती आहेत त्यांचे लसीकरण सुरू आहे.

वर्षभरापासून जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस दिली जात आहेत. यात जवळपास ३४ लाख व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. लस आल्या तेव्हा लसीकरणासाठी लोक स्वतः हून पुढे येत नव्हते. कोरोना योद्ध्यांनी पहिल्या टप्प्यात लस घेतली. त्यानंतर अनेकजन लसीकरणाला पुढे आले. मध्यंतरी लसीकरणावर केंद्रावर रोज तीनशे ते सातशे लोक लस घेण्यासाठी येत होते. पुढे कोरोना मृतांची संख्याही वाढल्यानंतर अनेकजन लस घेण्यासाठी एकाच वेळी पुढे आले. त्यामुळे गर्दी वाढली. त्याचवेळी लशीचा तुडवडा जाणवत होता.

हेही वाचा: जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

सप्टेंबरनंतर पुरेशा प्रमाणात लस आल्या. त्याचवेळी कोरोना कमी झाला. लसीकरण करण्यास अनेकांनी चाल ढकल केली. जिल्हा आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लसीकरणाची आठवण करून दिली. असे असूनही जिल्ह्यात तीन लाख लोकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. यासाठी नव्याने लसीकरण शिबिर लावली जात आहेत.

नंबरवरून करा प्रमाणपत्र डाऊनलोड

कोरोनाच्या नवा व्हेरियंटच्या पार्श्‍वभूमीवर शासनस्तरावर निर्बंधही घातले जात आहे. यात परराज्यात जाण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्रही दाखवावे लागते. अशा स्थितीत अनेकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड केलेले नसल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्या लसीकरणा वेळी जो नंबर दिला आहे, त्याच नंबरवरून हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घेता येणार आहे.

"कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा सर्व तालुक्यात पुरेसा साठा आहे. त्या आधारे महिन्याभरात एकही डोस न घेतलेल्या व्यक्ती शोधून त्यांचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे लस घेतलेली नाही त्यांनी लस घ्यावी."

-डॉ. फारूक देसाई, जिल्हा लसीकरण अधिकारी

Web Title: Three Lakh People District Who Have Not Taken Single Dose

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurdistrict
go to top