'या' तालुक्यात तीन प्रकल्प पूर्ण भरले, एकूण 18 प्रकल्पात 79 टक्के पाणी साठा

Three Projects In Chandgad Filled To Full Capacity Kolhapur Marathi News
Three Projects In Chandgad Filled To Full Capacity Kolhapur Marathi News
Updated on

चंदगड : तालुक्‍यातील तीन मध्यम प्रकल्प आणि 15 लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या एकूण पाणी संचयाच्या 79 टक्के साठा झाला आहे. सर्व प्रकल्पात मिळून 5 हजार 881.01 दश लक्ष घन फूट पाणी साठवण्याची क्षमता आहे. त्यापैकी 4 हजार 649.50 टक्के पाणी साठा झाला आहे. यामध्ये दोन मध्यम प्रकल्प व एक लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. पावसाळ्याचा उर्वरीत कालावधी विचारात घेता बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍यात घटप्रभा (फाटकवाडी), जांबरे आणि जंगमहट्टी हे मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी फाटकवाडी प्रकल्प 28 जूनला, तर जांबरे प्रकल्प 8 जूलैला पूर्ण क्षमतेने भरले. जंगमहट्टी प्रकल्पात आत्तापर्यंत 55 टक्के पाणी साठा झाला आहे. उर्वरित 15 लघु पाटबंधारे प्रकल्पापैकी कळसगादे प्रकल्प 6 जुलैला भरला आहे.

आंबेवाडी 80.01, दिंडलकोप 66.38, हेरे 55.93, जेलुगडे 82.98, करंजगाव 42.06, खडकओहोळ 31.88, किटवाड क्रमांक 1 58.99, किटवाड क्रमांक 2 64.50, कुमरी 46.72, लकीकट्टे 75.86, निट्टूर क्रमांक 2 44.45, पाटणे 85.96, सुंडी 75.56, कांजीर्णे 80.90 या प्रमाणात भरले आहेत. बहुतांश प्रकल्प 60 ते 80 टक्के भरले आहेत. पावसाळ्याचा उर्वरित कालावधी पाहता ते पूर्ण क्षमतेने भरतील असे सागितले जाते.

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच प्रकल्प भरले होते. लकीकट्टे सारखा प्रकल्प बांधल्यानंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला होता. मुबलक पर्जन्यवृष्टीमुळे गतवर्षी प्रकल्पातील पाण्याचा उपसा खूपच कमी प्रमाणात झाल्याने उन्हाळ्याच्या अखेरीपर्यंत प्रकल्पीय पाणी साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक होता.

त्यामुळे या वर्षी अद्याप मोठा पाऊस झालेला नसतानासुद्धा उपलब्ध पावसाने प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झालेली दिसते. उर्वरित कालावधीत मोठा पाऊस झाला तर बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरण्याची खात्री आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. 

चंदगड तालुक्‍यातील एकूण प्रकल्प-18, 100 टक्के भरलेले-3 
- 80 टक्केहून अधिक भरलेले - 4 
- 70 टक्केहून अधिक भरलेले - 2 
- 60 टक्केहून अधिक भरलेले - 2 
- 50 टक्केहून अधिक भरलेले - 3 
- 40 टक्केहून अधिक भरलेले - 3 
- 30 टक्केहून अधिक - 1 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com