
कोल्हापूर : छत्रपती शाहू टर्मिनसवरील आगाऊ तिकीट आरक्षण कार्यालयात दिव्यांगांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे चित्र आज समोर आले. दिव्यांगांना रांगेत उभे राहून तिकिटांचे बुकिंग करावे लागले. ना त्यांना बसायला खुर्च्या, ना कार्यालयात जाण्यासाठी दिव्यांगांचा मार्ग. त्यामुळे त्यांची ससेहोलपट तर झालीच, शिवाय दिव्यांगांशी रेल्वे कर्मचारी आपुलकीने कधी बोलणार, असा प्रश्नही उपस्थित झाला.