शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

कोरोना नियमांचे पालन करतच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उद्या (ता. ७) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास घटस्थापना होणार असून, यावेळी परंपरेप्रमाणे तोफेची सलामी दिली जाणार आहे.

दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करतच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. यंदाच्या उत्सवात सप्तमातृका या संकल्पनेवर आधारित देवीच्या सालंकृत पूजा बांधल्या जाणार आहेत.

श्री अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनासाठी शहरातील दहा ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन उभारण्यात आले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवमस्थान समितीच्या संकेतस्थळाबरोबरच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर देवीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून, त्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधली जाणार आहे.

हजारो फुले-फळांनी सजले मंदिर

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज मंदिराची हजारो फुले आणि फळांनी सजावट करण्यात आली. एनर्जी इनकॉर्पोरेशनचे स्वप्नील हिडदुगी यांनी ही सजावट केली असून, ‘एनर्जी’च्या कलाकारांबरोबरच देवस्थान समितीचे राहुल जगताप, सुयश पाटील यांचे सहकार्य मिळाले. ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष (कै.) सुभाष हिडदुगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नऊ दिवस मंदिराची सजावट विनामूल्य केली जाणार असल्याचे स्वप्नील यांनी सांगितले. सजावटीसाठी पाच हजार गुलाब, दोन हजार लिली, दोन कार्नेशन, एक हजार अंथुरियम, दीड हजार किलो शेवंती, दोन हजार किलो झेंडू, एक हजार किलो हिरवी पाने, पन्नास डझन सफरचंद, पन्नास डझन डाळिंब, पन्नास डझन मोसंबी, तीस डझन अननस आदींचा त्यासाठी वापर केल्याचेही ते म्हणाले.

साधेपणाने मूर्तीचे आगमन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी यंदाही नियमावली जाहीर केली असून, मंडळे कोणत्याही मिरवणुकीशिवाय साध्या पद्धतीनेच मूर्तीचे आगमन करणार आहेत. त्यासाठी गल्लोगल्ली मंडप उभारले असून, उद्या (गुरुवारी) येथे चार फुटांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

महालक्ष्मी अन्नछत्राला आजपासून प्रारंभ

कोरोनामुळे बंद असलेले महालक्ष्मी अन्नछत्रही उद्या (गुरुवार) पासून खुले होणार असून, पहिल्या दिवशी किमान दोन हजार भाविकांना मोफत भोजन दिले जाणार आहे. सकाळी साडेअकरा ते दुपारी चारपर्यंत अन्नछत्र खुले असेल, अशी माहिती अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी दिली.

kolhapur
कोल्हापूर - आरवच्या हत्येचा उलगडा; बापानेच केलं कृत्य

उत्सवातील श्री अंबाबाईच्या पूजा अशा...

गुरुवार (ता. ७) - ब्रह्माणी

शुक्रवार (ता. ८) - माहेश्वरी

शनिवार (ता. ९) - कौमारी

रविवार (ता. १०) - अंबारातील गजारूढ

सोमवार (ता. ११) - वैष्णवी

मंगळवार (ता. १२) - इंद्राणी

बुधवार (ता. १३) - महिषासूरमर्दिनी

गुरुवार (ता. १४) - चामुंडा

शुक्रवार (ता. १५) - अश्वारूढ रथातील

kolhapur
Breaking ! महाशिवरात्रीनिमित्त शहरातील चार मंदिरात भाविकांना दर्शनासाठी मनाई; महापालिका आयुक्‍तांनी काढले आदेश

ऑनलाईन बुकिंगला ; उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजता लिंक ओपन झाल्यानंतर पहिल्या तासात चार हजारांहून अधिक भाविकांनी ऑनलाईन बुकिंग केले. रात्री नऊपर्यंत तीस हजार भाविकांनी बुकिंग केले होते. त्यामुळे उत्सवातील पहिल्या तीन दिवसांतील दर्शनासाठी बुकिंग फुल्ल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com