गुणवंत कामगार पुरस्कार शिवाजी पाटील यांना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणवंत कामगार पुरस्कार शिवाजी पाटील यांना प्रदान
गुणवंत कामगार पुरस्कार शिवाजी पाटील यांना प्रदान

गुणवंत कामगार पुरस्कार शिवाजी पाटील यांना प्रदान

sakal_logo
By

17178
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे शिवाजी पाटील यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करताना ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू. शेजारी विनिता वेध-सिंघल, सुरेश जाधव आदी.

गुणवंत कामगार पुरस्कार
शिवाजी पाटील यांना प्रदान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील शिवाजी सुबराव पाटील यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पाटील यांच्या गेल्या २८ वर्षांतील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेध-सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डॉ. अश्‍विनी जोशी, उपसचिव डॉ. श्रीकांत कुंडवार, उपसचिव शशांक साठे, कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती होती. मुंबई येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.
शिवाजी पाटील हे टाटा मोटर्समध्ये (पिंपरी) येथे २८ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची गुणवत्ता पाहून कंपनीने सेफ्टी अवॉर्ड, सजेशन अवॉर्ड, उत्तम हजेरी पुरस्कार प्रदान केले आहेत. कंपनीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गरजूंना कपडे वाटप, अनाथाश्रमाला साहित्य वाटप, स्वाइन फ्लू लसीकरण अभियान, नदीप्रदूषण अभियान, एड्स जनजागृती, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा संवर्धन, रक्तदान यासह विविध सामाजिक कार्यात ते सहभागी असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top