आंबा घाटात सव्वाशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला

आंबा घाटात सव्वाशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला

1783
आंबा घाट ः येथे सोमवारी दुपारी सव्वाशे फूट दरीत कोसळलेला ट्रक.
सव्वाशे फूट दरीत
ट्रक कोसळला
आंबा घाटात दुर्घटना, चालक बचावला
आंबा, ता. ६ ः चालकाचा ताबा सुटल्याने साखरेची पोती भरलेला ट्रक आज येथील घाटात सव्वाशे फूट खोल दरीत कोसळला. ट्रकचालक राणा ईरा चावडा (वय ६२, रा. पोरबंदर, गुजरात) जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. साखरेसह ट्रकचे सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घाटातील चक्री वळणावर दुपारी तीनच्या सुमारास अपघात झाला. साखरपा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले, की चावडा कर्नाटकहून जयगडकडे साखर घेऊन येत होते. घाटातील चक्रीवळणावर येताच त्यांच्या ताबा सुटल्याने ट्रक
(जी. जे. ११ झेड ०७३७) संरक्षक कठडा तोडून सव्वाशे फूट खोल दरीत कोसळला. ते केबिनमध्ये अडकले. त्यांच्या डाव्या पायाची टाच तुटली आहे. त्यांना येथील अमर पारळे व त्यांच्या दोन मित्रांनी केबिनमधून बाहेर काढले. त्यांच्यावर आंबा आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेने सीपीआरमध्ये दाखल केले. पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, हेड कॉन्स्टेबल सागर उगळे तपास करत आहेत.
फोटो - २ ( आंबा - घाटातील चक्रीवळणावरून सव्वाशे फूट खोल दरीत ट्रक कोसळला.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com