गवा रेडा नुकसानीबाबत व इतर मागण्यांचे निवेदन

गवा रेडा नुकसानीबाबत व इतर मागण्यांचे निवेदन

00878
गव्यांचा उपद्रव, गगनबावड्यात निवेदन
साळवण : गगनबावडा तालुक्यात गव्यांचा लोकवस्तीत शिरकाव वाढला आहे. शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सकल मराठा समाज संघटना गगनबावडाने केली. परिक्षेत्र वन अधिकारी अविनाश तायनाप यांना तसे निवेदनही दिले. निवेदनात म्हटले आहे, गगनबावडा तालुका डोंगराळ आहे. गव्यांपासून शेतीस व नागरिकांना संरक्षण मिळावे, वनहद्दीवर सोलर कुंपण घालावे, नुकसान भरपाईत वाढ करावी, मनुष्यहानी झाली तर भरपाई मिळावी, वनतळ्यांची संख्या वाढवावी. मागण्यांची पूर्तता केली नाही तर शुक्रवारी (ता.१०) निवडेत रास्ता रोको करू.’’ शिवाजी राऊत, युवराज पाटील, सचिन जाधव, संभाजी पाटील, संदीप पाटील, सदन पाटील, रणजित पाटील, प्रकाश मोरे, शरद पाटील, अमोल पाटील, आदर्श कोटकर आदी उपस्थित होते. पिकांची वाढ होताच वन्यजीवांकडून पिके फस्त केली जातात. परिणामी शेती बेभरवशाची बनली आहे. वनविभागाने मागण्यांची पूर्तता केली नाही तर आंदोलन करू, असा इशाराही संघटनेने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com