22 मार्च  :  जागतिक जल दिन

22 मार्च : जागतिक जल दिन

00937


‘कुंभी’त ६५, ‘कासारी’त ५० टक्के पाणीसाठा
जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे ‘पाटबंधारे’चे नियोजन;
पंडित सावंत ः सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. २३ : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्‍यात कुंभी मध्‍यम तर कोदे, अणदूर, वेसरफ हे लघु असे एकूण चार पाटबंधारे प्रकल्‍प आहेत. प्रकल्पात आज (ता. २३) शिल्‍लक असणारा पाणीसाठा कुंभी, सरस्‍वती व रूपणी नदीकाठावरच्‍या गावांना मेअखेर पुरेल. मात्र धामणी मध्यम प्रकल्पाची व्याप्ती असलेल्या धुंदवडे खोऱ्यातील काही गावांना एप्रिल-मेमध्‍ये पाणीटंचाई झळा सोसाव्‍या लागतील.
लखमापूरमधील कुंभी मध्‍यम प्रकल्‍पात १.७१ टीएमसी म्हणजेच क्षमतेच्या ६५.७६ टक्के पाणीसाठा आहे. गगनबावड्यासह पन्‍हाळा व करवीर या तीन तालुक्‍यांतील हजारो एकरांतील पिके सिंचनासाठी प्रकल्पावर अवलंबून आहेत. या प्रकल्पातील पाणी कुंभी नदीत सोडले जाते. बॅक वॉटर पध्दतीने कळे बंधाऱ्यातून पाणी धामणी नदीत सोडावे लागते. कोदे लघु प्रकल्‍पात ५२.९७ टक्के, अणदूर प्रकल्पात ६३.८३ टक्के तर वेसरफ प्रकल्पात ४०.६५ टक्के पाणीसाठा आहे.
धुंदवडे खोऱ्यातील गावे धामणी नदीवर अवलंबून आहेत. खेरीवडेपासून पश्चिमेकडील गावे व वाड्या-वस्‍त्‍यांना मार्चमध्ये धामणी नदीचे पात्र कोरडे पडत असल्‍याने पाण्यासाठी वणवण करावी लागते. कुंभी नदीतून बॅकवॉटर योजनेद्वारे धामणी नदीपात्रात पाणी आणण्याच्या प्रयोगामुळे पूर्वेकडील नदीपात्र भरत असले तरी पश्चिमेकडील नदीपात्र कोरडेच असते. पाणीसाठा करण्यासाठी धामणी नदीवर दरवर्षी श्रमदानातून व स्‍वखर्चातून लाखो रुपये खर्च करून मातीचे बंधारे घालतात. पण हे पाणीही कसेबसे एप्रिलपर्यंत पुरत असल्‍याने पुढील महिन्यात टंचाई जाणवते. पिण्‍याच्‍या पाण्‍यासह शेती व जनावरांच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर बनतो. धामणी प्रकल्‍प पूर्ण झाल्यानंतरच धुंदवडे खोऱ्यातील पाण्‍याची समस्‍या संपुष्‍टात येईल.
-----------
कोट
गगनबावडा तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील शिल्‍लक पाणीसाठा मेअखेरपर्यंत पुरेल. मात्र हे पाणी जूनपर्यंत पुरवण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. लोकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.
- अजिंक्य पाटील, शाखाधिकारी, कळे पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com