रासाईदेवी यात्रा विशेष असंडोली साठी लेख

रासाईदेवी यात्रा विशेष असंडोली साठी लेख

रासाई देवीचे फोटो व रासाई मंदिर
00978, 00977, B00976

पट्टी ः श्री रासाईदेवी यात्रा विशेष असंडोली

असंडोलीचे जागृत
देवस्थान रासाईदेवी

गगनबावडा तालुक्यातील असंडोली एक छोटसं गाव. देवी रासाई हे गावचं जागृत देवस्थान. ६३ खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रासाईदेवीची आज मंगळवारी (ता. २४) यात्रा आहे. रासाईदेवीचे माहात्म्य अगाध आहे. त्याविषयी…
------------

केदारविजय ग्रंथात रासाईदेवीच्या पराक्रमाचा उल्लेख आढळतो. कोल्हापूरच्या अंबाबाईने ज्यावेळी कोल्हासूर आणि रत्नासूर या दोन बलशाली दैत्यांचा वध केला त्यामध्ये रासाईदेवीचा पराक्रम अवर्णनीय आहे. दैत्यांचा ऱ्हास करण्यासाठी रासाईदेवीने पुढाकार घेतला आणि त्यावरून ‘रासाई’ नाव प्रसिद्धीला आले असावे; असे जुन्या पिढीतील जाणकार लोक सांगतात. या दैत्यांचा ऱ्हास करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नेतृत्वाखाली सर्व देवी गेल्या होत्या. एकीचे बळ याचा प्रत्यय दैत्यांना आला आणि त्यांनी शरणागती पत्करली. दैत्यांनी लक्ष्मीदेवीजवळ वर मागितला की, आमच्या आत्म्यास वर्षातून भक्ष्य मिळावे. याची दखल घेऊन रासाईने तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला, म्हणून नारळी पौर्णिमा व दसऱ्याचा जागर या दोन दिवशी रात्री १२ वाजता या दैत्यांचा रासाई देवळात संचार होतो. आजतागायत हे दैत्य एकमेकांवर तलवारीने वार करून भक्ष्य तोडून घेतात. दसऱ्याच्या जागराला रात्री १२ वाजता ६३ खेड्यांतील भुतावळ रासाई देवीच्या भेटीला आजही येतात. त्यांना मोकळीक मिळावी म्हणून नवरात्रीसाठी बसलेले भक्तगण जोतिबा देवालयात मुक्कामास जातात व तेथे जागर घातला जातो. अशाच एका जागरादिवशी अजाणतेपणे मूल रासाई मंदिरात राहते. त्याचवेळी दैत्यांचे आगमन होते. दैत्यांच्या भुतांपासून मुलाच्या जीवितास धोका आहे हे जाणून देवीने त्या मुलाला ओटीपोटात लपवून अभय दिले म्हणून घटस्थापनेच्या घटावर वाळूक (काकडी) ठेवून देव ठेवतात. त्यादिवशी चव्हाट्यावर ते वाढविले जाते.
७० वर्षांपूर्वी देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली. त्यावेळी कौल लावल्यानंतर ती चोरी पूर्णपणे उघडकीस आली. तो दिवस होता मे महिन्यात अक्षय तृतीयेनंतरचा पहिला मंगळवार, म्हणून या दिवशी आजही देवीची यात्रा भरवली जाते. आजतागायत बऱ्याच भक्तांच्या चोऱ्या सापडल्या आहेत, सापडत आहेत. हे देवस्थान म्हणजे महाराष्ट्रातील जागृत देवस्थानापैकी एक आहे.
रासाईदेवीची यात्रा ही अखंडितपणे सुरू आहे. ती कधीही थांबलेली नाही. गावातील ग्रामस्थ मंडळी, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत यात्रा उत्साहात व शांततेत पार पाडतात. नवरात्रीमध्ये तालुक्यासह परप्रांतातील शेकडो लोक याठिकाणी नवस फेडण्यासाठी बसतात. यात्रेची परंपरा जोपासणाऱ्या गावातूनच रासाईदेवीवर श्रद्धा असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा नारळ फुटतो. उरुसानिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवीची पालखी मिरवणूक झाल्यानंतर रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्याचा रिवाज या गावाने आजही पाळला आहे.
चालू वर्षी रासाईदेवी यात्रेनिमित्त काकडारती, देवीला अभिषेक, आरती, दुपारी नैवैद्य, बैलगाडीतून देवीची मिरवणूक, पालखी, रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी निकाली कुस्त्यांचे आयोजन यात्रा कमिटीच्यावतीने केले आहे.

- पंडित सावंत, गगनबावडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com