खा. पवार साहेबांच्या नेतृत्वाची देशाला गरज

खा. पवार साहेबांच्या नेतृत्वाची देशाला गरज

01730
‘शरद पवारांच्या नेतृत्वाची देशाला गरज’
बिद्री ता. ४ : खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. देश कठीण काळातून जात असून देशाला पवार यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी केली.
फराकटे म्हणाल्या, ‘केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या घामाला योग्य दाम मिळाला. साठ वर्षांत सामान्य कार्यकर्त्याला संधी देत त्यांनी पक्षसंघटना मजबूत केली. त्यांची कामाची उमेद कार्यकर्त्याला नवी उभारी देते. शरद पवार यांच्या नेतृत्वाची राज्यालाच नव्हे तर देशालाही गरज आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ते निर्णय निश्चितच मागे घेतील.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com