बोरवडे ग्रामपंचायतीने थकीत पाणी कनेक्शन  तोडली

बोरवडे ग्रामपंचायतीने थकीत पाणी कनेक्शन तोडली

बोरवडे ग्रामपंचायतीने तोडली थकीत पाणी कनेक्शन

ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी धावाधाव

बिद्री, ता. ८: बोरवडे (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीने पाच वर्षे पाणीपट्टी थकीत असलेल्या नळधारकांचे पाणी कनेक्शन तोडली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. थकबाकी भरण्याबाबत संबंधितांना नोटीस न देता ग्रामपंचायतीने ही कारवाई केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
थकीत पाणीपट्टी व घरफाळा भरण्यासाठी गावातील प्रमुख चौकात महिन्यापूर्वी डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. त्यानुसार काही नागरिकांनी पैसे भरले. काही नागरिकांनी अर्धे पैसे भरुन उर्वरित रक्कम नंतर भरण्याचे मान्य केले. परंतु ग्रामपंचायतीने ही अट नाकारत थकबाकीदार नागरिकांची नळ कनेक्शन तोडली. यावर ग्रामस्थ व कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. ग्रामस्थांनी सदस्यांना धारेवर धरत आम्हाला नोटीस देऊन कळवले पाहिजे होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी कुठे जायचे, असा प्रश्न उपस्थित केला.
याबाबत ग्रामसेवक सागर पार्टे म्हणाले, ‘सात ते आठ वर्षे काही नागरिकांनी पाणीपट्टी व घरफाळा भरलेला नाही. त्यामुळे गावातील सर्व चौकात नोटीस लावून सूचना दिली होती. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. या शासकीय कामात कोणी अडथळा आणला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. गावात एकूण १४२३ नळकनेक्शन असून घरफाळा ३४ लाख रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. सध्या ७९ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामुळे कामगार पगार, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती व अन्य देणी देताना ग्रामपंचायतीस अडचणी येत आहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com