Wed, Feb 8, 2023

ज्योतिर्लिंग मध्ये विज्ञान प्रदर्शन .
ज्योतिर्लिंग मध्ये विज्ञान प्रदर्शन .
Published on : 16 January 2023, 6:44 am
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे - निगवे प्रशालेत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त करवीर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविले. तालुक्यातील ७५ शाळांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. वैज्ञानिक प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ज्ञानात वाढ करावी, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी समरजीत पाटील, विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, शिक्षणविस्तार अधिकारी शंकरराव यादव, धनाजी पाटील, विश्वास सुतार, मुख्याध्यापक एम. एम. पाटील, केंद्रप्रमुख विजयकुमार केंद्रे, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.