जाखले शाळेत पाद्यपूजनाने पालक गहिवरले

जाखले शाळेत पाद्यपूजनाने पालक गहिवरले

02229
जाखले शाळेत पाद्यपूजनाने पालक गहिवरले
बोरपाडळे : मूल्यशिक्षणामधून संस्कारांची शिदोरी मिळते. बालसंस्कार बालमनावर अविरत ठसा उमटवणारे असतात. आई-वडिलांप्रती जिव्हाळा आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यामंदिर जाखले (ता.पन्हाळा) शाळेत पाद्यपूजन कार्यक्रम झाला. पहिली ते चौथीच्या दीडशे विद्यार्थी व 200 पालकांचा सहभाग होता. मुलांनी मनोभावे पूजल्याने तसेच औक्षण केल्याने मातापालक भारावून गेल्या. आरती बोराटे, सानिया निकम आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी पोलिसपाटील उजाला पाटील होत्या. मुख्याध्यापिका विजया चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मधुकर काटे यांनी स्वागत आणि पाद्यपूजनाचे महत्त्व सांगितले. गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, केंद्रप्रमुख सुभाष केरीपाळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन कदम यांचे मार्गदर्शन लाभले. भारती चोपडे , शोभा कुंभार, राजेंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. महेश देसाई, नानासो बोराटे, शिवाजी पाटील बबलू वडर, विद्या चौगुले, पूनम गायकवाड, सोनाली पाटील, अर्चना आडूरकर, सविता पाटील उपस्थित होते. सरपंच जयश्री देशमुख, उपसरपंच जोतिराम गवळी यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन विजय केरबा यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com