विधवेला संक्रात वाण देवून हळदी कुंकू समारंभ फोटोसह

विधवेला संक्रात वाण देवून हळदी कुंकू समारंभ फोटोसह

02114

कसबा वाळवेत विधवेला संक्रांत वाण
कसबा वाळवाः विधवेला दुखातून बाहेर काढून तिला जगण्याचे बळ महिलांनीच दिले पाहिजे. विधवेनेच एका विधवेला बळ देवून जगण्याची ताकद दिली, असे प्रतिपादन राधानगरीतील सामाजिक कार्यकर्त्या सीमा हुपरीकर यांनी केले. त्या कसबा वाळवे ( ता. राधानगरी) येथे राधानगरी तालुका ब्राह्मण समाज जागृती सेवा संघातर्फे संक्रात वाण व हळदी-कुंकू समारंभात बोलत होत्या. श्रीमती हुपरीकर यांनाच संक्रात वाण देण्यात आले. अध्यक्ष अभिजित हुपरीकर, उपाध्यक्ष वसंतराव कुलकर्णी यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन केले. वसुधा कुलकर्णी यानी स्वागत, डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संक्रात आणि वाणाविषयी अश्‍विनी कुलकर्णी यांनी माहिती दिली. महिलांसाठी फनीगेम्स घेतल्या. कराओके वर जान्हवी कुलकर्णी, श्रध्दा गुळवणी, जास्वंदी कुलकर्णी, रूपा बाजी, हेमंत कुलकर्णी, प्रकाश गुळवणी,जितेंद्र कुलकर्णी, राजू कुलकर्णी यांनी गाणी गायली. पूनम देसाई यानी सूत्रसंचालन, अंकिता जोशी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com