राशिवडे कृषी महोत्सव समारोप

राशिवडे कृषी महोत्सव समारोप

जिल्हा कृषी महोत्सवाची सांगता
राशिवडे बुद्रुक : पाच दिवसांपासून राशिवडे (ता. राधानगरी) येथे आयोजित कोल्हापूर जिल्हा कृषि महोत्सवाचा आज सांगता झाली. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक रविंद्र पाठक, रेशीम अधिकारी रेश्मा चंदनशिवे आदींसह विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी मार्गदर्शन सत्राला आज निंबराज निंबाळकर यांनी गूळ उत्पादन, मोहन कदम यांनी मधुमक्षिका पालन, मंगेश बेंडखळे यांनी चारा प्रक्रिया, मकरंद जोशी यांनी सेंद्रिय खतनिर्मिती विषयांवर मार्गदर्शन केले.जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणा-या, प्रयोगशील शेतक-यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पाच दिवसांपासून चालू असलेल्या महोत्सवाला जिल्ह्यातील जवळपास दोन लाख लोकांनी भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com