‘सकाळ’ चंदगड संपर्क कार्यालयाचा आज वर्धापन दिन

‘सकाळ’ चंदगड संपर्क कार्यालयाचा आज वर्धापन दिन

जैवविविधता विशेषांकाचा फोटो वापरवा
-------------------------------------
‘सकाळ’ चंदगड संपर्क
कार्यालयाचा आज वर्धापन दिन
स्नेहमेळाव्याचे आयोजन; जैवविविधता विशेषांकाचे होणार प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ५ : येथील ''सकाळ'' संपर्क कार्यालयाचा २१ वा वर्धापन दिन उद्या (ता. ६) साजरा होत आहे. यानिमित्त वाचक, जाहिरातदार, वितरक,  हितचिंतकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रवळनाथ मंदिराच्या सभागृहात हा मेळावा होईल.
‘सकाळ’ने नेहमीच तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. येथील विविध प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडवण्याच्या दृष्टीने चालना दिली आहे. ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात येणारे विशेषांकही या विभागाच्या विकासाला गती देतील असेच निवडले. गेल्या २१ वर्षात स्थानिक प्रश्न मांडणारे विशेषांक वाचकांच्याही पसंतीचे उतरले. अनेकांना उद्योग, व्यवसायाची दिशा मिळण्यासाठी मदत झाली. यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवली आहे.
चंदगड, आजरा, गडहिंग्लजचा परिसर म्हणजे निसर्गाचे वरदान. त्याच अनुषंगाने येथे जैविविधताही पहायला मिळते. त्याची माहिती देणारा ‘जैवविविधता’ हा विशेषांक यावर्षी प्रसिद्ध करण्यात येत आहे. अंकामध्ये परिसरातील जैवविविधतेचा आढावा घेतला आहे. प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, विद्यार्थ्यांसह पर्यावरण अभ्यासकांसाठी हा अंक संग्राह्य असेल. त्याचे वाचकातून स्वागत होईल असा विश्वास आहे. स्नेहमेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘सकाळ’च्या वतीने केले आहे.
--------------------
सकाळमधील कात्रणांचे प्रदर्शन.....
पाटणे (ता. चंदगड) येथील वयोवृद्ध वसंत सोनार यांनी अनेक वर्षापासून ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होणारे महत्त्वपूर्ण लेख, विविध विषयांवरील लेखमाला, आयुर्वेद, योगासने आदींची माहिती देणाऱ्या कात्रणांचा संग्रह केला आहे. आकर्षक पद्धतीने चिकटवून त्या प्रत्येक विषयाचे छोटे पुस्तक तयार केले आहे. स्नेहमेळाव्याच्या ठिकाणी वाचकांना ते पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com