दाटेत हाणामारी

दाटेत हाणामारी

दाटेत दोन कुटुंबांत हाणामारी
परड्यात मोटार लावण्याचे कारण; आठ जण जखमी

चंदगड, ता. २ ः दाटे (ता. चंदगड) येथे परड्यात मोटार लावण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबांतील मिळून आठ जण जखमी झाले. दोन्ही बाजूंकडून येथील पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
राजेंद्र मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या परड्यात अंकुश शिवाजी मोरे यांनी ट्रॅक्टरच्या साहित्यासमोर आपली मोटार लावली होती. ती काढून घ्यावी, अशी सूचना राजेंद्र यांनी केली असता अंकुश यांनी मी गाडी काढणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू केली. राजेंद्र यांच्या पत्नी रेणुका यांच्याकडे पाहून शिवीगाळ करीत तिच्या डोक्यात लाकडी टोणा मारला. त्याचवेळी संशयित शिवाजी रामू मोरे, कमल शिवाजी मोरे, गीता प्रकाश मोरे, राधाबाई कृष्णा मोरे यांनीही रेणुका यांना मारहाण केली. यावेळी तानाजी बयाप्पा मोरे व त्यांच्या पत्नी सरिता समजूत काढण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली. सर्व संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर शिवाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा अंकुश परड्यात मोटार लावत असताना राजेंद्र मोरे यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी शिवाजी यांनी तू शिवीगाळ करू नको आपल्या वाटण्या पंचांना बोलवून परत करुया, असे समजावून सांगत असताना राजेंद्र यांनी हातातील टोणक्याने अंकुश यांच्या डोक्यात मारहाण केली. शिवाजी यांच्या पत्नी कमल, भावजय राधाबाई, चुलत सून गीता प्रकाश मोरे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यासाठी संशयित सुजित संभाजी मोरे, तानाजी बयाप्पा मोरे, संभाजी बयाप्पा मोरे, रेणुका राजेंद्र मोरे, चंद्रभागा तानाजी मोरे यांनी मदत केल्याने त्यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या दोन कुटुंबांत वडीलोपार्जित शेती व घराच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल सुतार तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com