मगरीचे दर्शन

मगरीचे दर्शन

02481

तावरेवाडी : नदीपात्रात नागरिकांना मगरीचे दर्शन होत आहे.
-----------

तावरेवाडी येथे ताम्रपर्णीत मगरीचे दर्शन

चंदगड : तावरेवाडी ( ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून मगरीचे दर्शन होत आहे. पहाटेच्या वेळी शेताकडे जाणाऱ्या नागरिकांना मगर दिसत असल्याने भीतीचे वातावरण आहे. दोन वर्षांपासून ताम्रपर्णी नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी मगरीचे दर्शन झाले आहे. गेल्या वर्षी कोवाड परीसरात मगरीचा वावर होता. यावर्षी तावरेवाडी, महागाव, शिवनगे पट्ट्यातील नदीपात्रात मगर दिसून येत आहे. जनावरांना पाण्याला घालणे तसेच कपडे धुण्यासाठी नदीपात्रावर नागरीकांची ये - जा सुरू असते. मगर दिसल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
...

मेघोली लघुप्रकल्पास प्रशासकीय मान्यता ःआबिटकर

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास ४१ कोटी ६५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरूवात करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. मेघोली प्रकल्प फुटल्यानंतर मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरुळ, सोनुर्ली, ममदापूर आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला होता. यामुळे प्रकल्पाच्या निधी मंजुरी व कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू होता. ६ मार्च २०२३ ला राज्याच्या जलसंधारण विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच कामाला सुरूवात करता येईल. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले.

...
03106

भोपळवाडी: साकव बांधकामाच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
...

साकव गैरव्यवहार चौकशीसाठी भोपळवाडीत रास्ता रोको

शाहूनगरः राधानगरी तालुक्यातील कौलवपैकी भोपळवाडी येथील साकव बांधकामाच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावर भोपळवाडी फाटा येथे अनुसुचित जाती,नवबौध्द कृती समितीच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे कोल्हापूर -राधानगरी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. कौलवपैकी भोपळवाडी या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक यांच्या शेतीकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधण्यासाठी ५९ लाख ९६ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. हे साकव अनुसूचित जातीच्या लोकांना लाभ होईल, अशा ठिकाणी बांधणे हे बंधनकारक आहे. मात्र याठिकाणी या साकवाचे बांधकाम झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी या कामाबाबत चालढकल करीत आहेत. याबाबत अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, तसेच हे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुरेश थोरात, सुशिल पाटील, उपसरपंच अजित पाटील, प्रकाश कांबळे, विशाल कुंभार, आणाप्पा चौगले, एम.आर.कांबळे,भीमराव कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
...

उत्तूर - गवसे रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी

उत्तूरः गवसे ते उत्तूर या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या उत्तूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे, या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास गोवा व कोकणाकडे जाणारे पर्यटक यांची संख्या वाढणार आहे. हा रस्ता आंबेओहळ व सर्फनाला प्रकल्पांना लागून आहे. आजरा साखर कारखान्याचे वाहतूक अंतर कमी होईल. मेस काठी वाहतुकीस सोयीस्कर होईल. या परिसरातील दुर्गम भागाचा विकास होईल. उत्तूर गावचा व विभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे. निवेदनावर भास्कर भाईगडे, मंदार हळवणकर, बाळासाहेब सावंत,प्रदिप लोकरे, धोंडिराम सावंत यांची नावे आहेत.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com