पत्र्याच्या शेडमधील 
एटीएम सेंटर बंद करा

पत्र्याच्या शेडमधील एटीएम सेंटर बंद करा

पत्र्याच्या शेडमधील एटीएम
सेंटर बंद करा : सुरेश कुट्रे
चंदगड : तालुक्यात काही ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये एटीएम सेंटर सुरू करण्यात आली आहेत. पक्के बांधकाम असल्याशिवाय अशा सेंटरना वीज कनेक्शन देऊ नये, असा नियम असताना महावितरण कंपनीने तिथे कनेक्शन दिले. यासंदर्भात महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष आहे. अशा प्रकारे दिलेली कनेक्शन ग्राहकांच्या जीवावर बेतणारी असल्याने ती बंद करावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश कुट्रे यांनी दिला आहे. तालुक्यात अडकूर, पाटणे फाटा आदी महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये एटीएम सेंटर सुरू करण्यात आली आहेत. पक्के बांधकाम असलेल्या इमारतीतच अशी सेंटर सुरू करावी, असा शासनाचा नियम आहे. मात्र, तो डावलून ही सेंटर सुरू करण्यात आल्याचा कुट्रे यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी ‘महावितरण’च्या बेपर्वाईमुळे बुक्कीहाळ येथे एका तरुणाचा जीव गेला. अशीच दुर्घटना या सेंटरमधून घडू शकते. शासनाने अशा प्रकारे मृत्यूचे सापळे तयार केले आहेत का? असा प्रश्‍नही कुट्रे यांनी विचारला आहे. दरम्यान, याबाबत ‘महावितरण’चे अभियंता विशाल लोधी म्हणाले, की कोणत्याही ग्राहकाला वीज कनेक्शन्सपासून वंचित ठेवू नये, असा ‘महावितरण’चा नियम आहे. त्यानुसार मागणी केलेल्या ग्राहकाला कनेक्शन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com