शिनोळी बुद्रुकमध्ये ‘जलजीवन’चे काम बंद पाडले

शिनोळी बुद्रुकमध्ये ‘जलजीवन’चे काम बंद पाडले

02737
शिनोळी बुद्रुक : जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले.
--------------------------------
जलजीवन योजनेचे काम बंद पाडले
शिनोळी बुद्रुकमध्ये विश्वासात न घेतल्याचा आरोप; सरपंचांच्या अनुपस्थितीत काम सुरू करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ८ : शिनोळी बुद्रुक ( ता. चंदगड ) येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या कामाला ठेकेदाराकडून रविवारी सुरुवात केली. मात्र ग्रामस्थांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने ही योजना मंजूर झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काम बंद पाडले.
गावासाठी एक कोटी ८० लाखांची नळपाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र काही स्थानिक पुढाऱ्यांनी जुन्याच योजनेवर नवीन योजना करण्याचा घाट घातला आहे. याला ग्रामस्थांचा विरोध आहे. बारमाही पुरेसे पाणी मिळेल अशा मोठ्या स्त्रोतावर आधारित नवीन योजना राबवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहारही केले आहेत. मात्र त्यांचे मत विचारात न घेता प्रशासनाने काल कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. संतप्त ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन काम बंद पाडले. सरपंचांच्या गैरहजेरीत हा प्रकार सुरू होता. त्याबद्दलही ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला. मात्र ते निरुत्तरीत राहिले. योग्य आराखडा निश्चित झाल्याशिवाय काम करू देणार नाही, असे ग्रामस्थांनी सुनावले.
---------------
जुने पाणीस्रोत अपुरा असल्यामुळे उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. त्याऐवजी नवीन स्रोतावर ही योजना राबवावी अशी आमची मागणी आहे.
- गणपत कांबळे, सरपंच
-------------
पाणी योजनेचा स्रोत तपासणी केल्यानंतर नवीन योजना राबवण्याबाबत विचार केला जाईल.
- एस. एल. कांबळे, उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, चंदगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com