जमीन कसणारे मालक होणार याचे समाधान

जमीन कसणारे मालक होणार याचे समाधान

2811
मजरे शिरगाव : हेरे सरंजाम भोगवटादारांच्या शिबिरासाठी राजेश चव्हाण, भरमूअण्णा पाटील, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
जमीन कसणारे मालक होणार याचे समाधान
शिवाजीराव पाटील; मजरे शिरगाव येथे हेरे सरंजाम अंतर्गत भोगवटादारांचे शिबीर
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३० : पिढ्यानपिढ्या जमिनीत घाम गाळणारे भोगवटादार त्या जमिनीचे प्रत्यक्ष मालक होणार याचेच मोठे समाधान असल्याचे मत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.
मजरे शिरगाव येथे हेरे सरंजाम अंतर्गत भोगवटादारांचे शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
हेरे सरंजाम अंतर्गत तालुक्यातील सुमारे ५२ गावातील जमिनी अद्यापही संस्थानच्या मालकीच्या आहेत. या जमिनी कुळांच्या नावे व्हाव्यात, असा शासकीय आदेश होऊन वीस वर्षे झाली तरी अजूनही त्याची पूर्तता झाली नाही याच मुद्द्यावर शिवाजीराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढला. जमिनीच्या आकाराच्या दोनशे पट भरायची रक्कम स्वामी प्रतिष्ठानने उचलली. शिवाय संबंधित कुळांना विहित नमुन्यात अर्ज करणे सोपे जावे म्हणून गावागावात शिबिरांचे आयोजन करण्याचे ठरले. त्यानुसार आज पहिले शिबिर मजरे शिरगाव येथे झाले. या तलाठी सज्जातील गावातील भोगवटादारांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर केले. दाखल झालेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी ठेवण्यात येणार आहेत. मंडल अधिकारी अमर पाटील, नामदेव पाटील, शांताराम पाटील, रवी बांदिवडेकर, बाबू परीट, अनिल शिवणगेकर, मायाप्पा पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com