कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

02852

गडहिंग्लज ः एव्हीएच आंदोलनातील कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर सर्वांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला.
---------

एव्हीएच आंदोलनातील कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

चंदगड, ता. ७ ः हलकर्णी (ता. चंदगड ) येथील औद्योगिक वसाहतीत दहा वर्षापूर्वी होऊ घातलेल्या कंपनीच्या विरोधातील आंदोलकांची गडहिंग्लज उपजिल्हा सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली. आंदोलनानंतर कंपनीने काढता पाय घेतला. मात्र कार्यकर्त्यांवर दाखल झालेले न्यायालयीन दावे सुरुच होते. नऊ वर्ष हे कार्यकर्ते न्यायलयीन लढा देत होते. निकालानंतर सर्वांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला.
कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असून त्याचे तालुक्यातील पर्यावरणावर दुष्परीणाम होणार असल्याने जनआंदोलन उभारण्यात आले होते. कंपनीच्या विरोधात सातत्याने आंदोलने सुरु होती. या प्रकरणी उत्तम चांदेकर तावरेवाडी, डॉ. संजय पाटील ढोलगरवाडी, गणपती पाटील मांडेदूर्ग, दीपक पाटील व सुभाष जाधव मुरकुटेवाडी, सुयोग शिंदे, यशवंत भोसले, विलास सावंत, पुंडलिक भांबर, कृष्णा कांबळे सर्व जंगमहट्टी, अंकुश कांबळे करंजगाव, परशुराम सुभेदार व शैलेश भातकांडे हलकर्णी यांच्यावर कंपनीने गुन्हे दाखल केले होते. आंदोलनाचा परिणाम म्हणून कंपनीने काढता पाय घेतला, परंतु न्यायालयीन प्रक्रीया सुरुच होती. अॅड. के. एस. सुरुतकर व अॅड. एस. एस. पाटील यांनी आंदोलकांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. नऊ वर्षाच्या लढाईनंतर सर्वजण निर्दोष मुक्त झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com