दोन गावातील भूसुरंगामुळे भिंतीना तडे

दोन गावातील भूसुरंगामुळे भिंतीना तडे

00939
राई (ता.राधानगरी) ः येथे भिंतीला गेलेले तडे (छायाचित्र :केरबा जाधव )

दोन गावातील भिंतींना तडे
धामणी मध्यम प्रकल्पाचे काम; मोठ्या प्रमाणात भुसुरुंगाचा वापर

धामोड , ता .२६ :राई (ता . राधानगरी ) येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम गतीने सूरु असून, मोठ्या प्रमाणात भुसुरुंगाचा वापर केल्याने दोन गावातील भिंतींना तडे गेले आहेत. येथील कुपनलिका व विहिरी यांच्या नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीला या सर्व बाबी निदर्शनास आणूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे .
राई येथील धामणी मध्यम प्रकल्प अनेक वर्ष निधीअभावी रखडला होता. गेल्या दोन महिन्यापासून अंतिम टप्प्यात असलेल्या या प्रकल्पाचे काम गतीने सुरू झाले आहे . हे काम एका कंपनीमार्फत सुरू आहे . सध्या प्रकल्पाचे काम करताना मोठ्या प्रमाणात भूसुरुंगाचा वापर केला जात आहे . त्यामुळे राई व मांडवकरवाडी या दोन गावातील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या परिसरातील राई, चौके, मानबेट , मांडवकरवाडी व कंदलगाव या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जिवंत झरे हा आधार असून भूसुरुंगाच्या अती वापरामुळे येथील नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतावरती परिणाम झाला आहे.

कोट
अति भूसुरुंगाच्या वापराने दोन गावातील भिंतींना गेलेले तडे असून याबाबत कंपनीशी चर्चा झाली आहे . कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे .
-संभाजी कांबळे, सरपंच मानबेट

कोट
भूसुरुंगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ही परिणाम होत आहे . तसेच या धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
-संतोष गोरुले, ग्रामस्थ, मांडवकरवाडी

कोट
याबाबत संबंधित कंपनीला भूसुरंगाची तीव्रता कमी करण्याबाबत चर्चा झाली आहे. दोन गावांमध्ये भिंतीला गेलेले तडे यांची पाहणी केली जाईल व याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे .
-एस आर पाटील, शाखा अभियंता, धामणी मध्यम प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com