केळोशी बुद्रुक येथे शुभारंभ

केळोशी बुद्रुक येथे शुभारंभ

केळोशी येथे कोल्हापूर पद्धतीचे
बंधारे बांधण्याचा आज प्रारंभ
धामोड : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत १९ गेटेड कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचा मंगळवारी (ता. २८) प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे, की राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या पाणी महोत्सवांतर्गत राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत १९ गेटेड कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून केळोशी बुद्रुक, खामकरवाडी व कोते परिसरातील सुमारे ५०३ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांचा याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. तसेच, लोंढा नाला प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. या प्रकल्पाला भुदरगड तालुक्यातील नागणवाडी प्रकल्पासारखे जमिनीऐवजी आर्थिक पॅकेज मंजूर करण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांची बैठकही आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच, गेली एक वर्ष आपण प्रयत्न करीत असलेल्या तुळशी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पाणी परवान्यांचे वाटप शासकीय विश्रामगृह, धामोड येथे करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com