रस्त्याची दुरावस्था

रस्त्याची दुरावस्था

01016
म्हासुर्ली-कोनोली तर्फ असंडोली रस्त्याची दुरवस्था
दहा वर्षे डांबरापासून वंचित; लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

धामोड, ता. ३० : म्हासुर्ली - कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तीन किलोमीटर अंतराचा रस्ता जीवघेणा बनला असून याकडे
लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
राधानगरी- गगनबावडा तालुक्यातील तेवीस गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. दहा वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. सध्या रस्त्याची दुरवस्था झाली असून खडी विस्कटली गेली आहे. तीन किलोमीटर रस्त्यात खड्डेच खड्डे असून वाहन चालवणे जिकिरीचे बनले आहे. सातत्याने या रस्त्यावरती अपघाताचे प्रकार घडत आहेत. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असून ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

कोट :
लोकप्रतिनिधी मतासाठी गावाचा वापर करतात. मात्र निवडणुकीनंतर पूर्णपणे विकासाबाबत दुर्लक्ष करतात. सध्या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले असून लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
- स्वप्नील पाटील, पाटीलवाडी ग्रामस्थ
-------

ग्रामपंचायतीतर्फे लोकप्रतिनिधींना अनेकदा रस्ता डांबरीकरणासाठी निवेदने दिली. या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सतत अपघात घडत आहेत. लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने दिली जातात, कार्यवाही होत नाही.
- नंदा सुतार, उपसरपंच कोनोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com